spot_img
5.5 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img

संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीड : राज्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा प्रथमच महाविकास आघाडी व महायुती म्हणून होत आहेत. त्यामुळे, यंदा जागावाटपात मोठा क्लिष्ट पाहायला मिळाला. तर, एकच जागा असल्याने विधानसभा मतदारसंघातील अनेक इच्छुकांची नाराजी झाली. त्यामुळे, राज्यातील बहुतांश मतदारसंघात बंडखोरी झाल्याचं दिसून आलं. पण, बंडखोरीनंतरही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला आहे.अनेक बंडखोरांची तलवार मान्य करण्यात पक्षाला यश आलं. मात्र, काही इच्छुकांनी अखेरपर्यंत बंडखोरी कायम ठेवली तर काहींनी पक्षांतर केले. त्यामध्ये, केज (ज्ञशक्ष) विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले होते. आता, संगीत ठोंबरे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत हाती तुतारी घेतली आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचं टेन्शन वाढलं आहे.
केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतला. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे संगीता ठोंबरे यांनी थेट भाजपाला आव्हान दिले आहे. त्यानंतर, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. स्वत: बजरंग सोनवणे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने पक्षाचे बळ निश्‍चितपणे वाढेल, असा विश्‍वास यावेळी बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. दरम्यान, केज मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या