spot_img
9.5 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

spot_img

तब्बल २० वर्षां नंतर भरला इयत्ता ४ थी चा वर्ग !

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
होय…! जि. प. प्राथमिक शाळा नायगांव चा इयत्ता ४ थी चा वर्ग पुन्हा एकदा २० वर्षांनी भरला. आपण सर्वांनी दहावी – बारावीचे विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ऐकलेला असेल मात्र ह्या ठिकाणी काही निराळंच घडलं.
शाळा… फक्त उल्लेख जरी झाला तरी या वास्तूमध्ये घालवलेले सोनेरी क्षण, असंख्य खोड्या, खेळलेले खेळ, मित्र – मैत्रिणीसोबतच्या गप्पा तसेच भांडणं आणि शिक्षकांचा ओरडा आठवतो. ही एक अशी वास्तू आहे जिथे आपण प्रवेश घेतल्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत बर्‍याच गोष्टी अगदी जशाच्या तशा आठवतात आणि नकळतच पापण्याही ओलवतात.
सन २००२ ते २००५ च्या इयत्ता १ ली ते ४ थी च्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा त्यांच्या शिक्षिका ए. एस. पाटोळे यांच्याच घरी नाशिक – म्हसरूळ येथे साजरा झाला. यावेळी शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटोळे मॅडम होत्या. चार वर्ष त्याच शिक्षिका आणि तेच विद्यार्थी असल्याने मॅडमला आजही सर्वांचे नावे त्यांचे गुण – अवगुण तोंडपाठ होते.
यावेळी आपले पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून माजी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने एकत्र जमले. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. शाळेतील काही माजी विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, तर कोणी वेगवेगळ्या व्यवसायिक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देत शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच पाटोळे मॅडम ने अशेच ऋणानुबंध जपत आपापल्या क्षेत्रात भविष्यकाळात अजून यशस्वी होण्याचे आशीर्वाद सर्वांना दिले. तसेच आपल्या विद्यार्थ्यांना सुख – समाधान मिळवा आणि टिकवा हे पुस्तक भेट दिले. आणि सर्व विद्यार्थ्यांतर्फे मॅडमला विद्येची देवता सरस्वतीची मूर्ती भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे नेटके संयोजन रोहन भांगरे, समाधान पानसरे, सागर चव्हाणके यांनी केले. तर शरद बुरकुल यांने फोटो सेशन केले. कार्यक्रमास विक्रम नागरे, गणेश बर्के, अमोल कदम, विक्रम बुरकुल, निवृत्ती गोसावी, दिपक पानसरे, पांडुरंग कडाळे, आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या