बीड : येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक (गुरूजनांचा) सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन सोमवार दि.४ नोव्हेंबर २०२४ रोजी बीड शहरातील दत्तमंदिर गल्ली, येथे करण्यात आले आहे. हे सर्व आयोजन सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे गुरूजनांच्या या सेवापूर्वी गौरव सोहळ्याला आवश्य उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रम हा सोमवार दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी दत्त मंदिर येथे होणार असून याची रूपरेषा सकाळी १० वाजता कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. प्रथम सर्वांना फेटे बांधणे व मान्यवरांचे आगमन, त्यानंतर सकाळी : १०:३०–१०:४५ औक्षण व पाद्यपूजन होणार आहे. सकाळी १०:४५ ते ११:०० व्यासपीठावर मान्यवरांचे आगमन होईल. व्यासपीठावर देशमुख सरांची जोडी, जेऊरकर मॅडम व जोडी, अर्धापूरकर मॅडम व जोडी ,तसेच श्री साळवे सर उपस्थित राहतील. त्यानंतर सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन, सत्कार मूर्तींचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.
त्यानंतर सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री साळवे सर करतील. इच्छुक विद्यार्थ्यांचे मनोगत यावेळी होणार आहे. सर्वांचे मनोगत व्यक्त झाल्यानंतर सत्कारमूर्तींचे भाषण होऊन अध्यक्षीय समारोप होईल. त्यानंतर आभार प्रदर्शन पार पडेल.दुपारी २.३० वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर जेवनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सत्कारमूर्तींना टिळक रोडवरून सजवलेली गाडीमध्ये बसवून घरी रवाना केले जाईल. तरी सर्वांनी या आनंदमयी क्षणाचा लाभ घ्यावा. आणि गुरूजनांच्या सेवापूर्वीता गौरव करण्यात यावा असे आवाहन सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.