बीड : पेठ बीड भागात रात्री अज्ञातांनी डोक्यात चिरा घालून खून केल्याची घटना रात्री उशीरा हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी पेठ बीड पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील या खूनामागे कोणाचा हात आहे. कोणी केला या संदर्भात पेठ बीड पोलिस शोध घेत आहेत.
पेठ बीड भागात टपरीवरुन पुडी आण म्हणले असता पुडी न आणल्याने गुंड प्रवृत्तीच्या आरोपीने डोक्यात चिरा घालून खूनच केला. ही घटना शहरातील पेठ बीड ोलीस ठाणे पासून हाकेच्या अंतरावर सुभाष कॉलनी येथे घडली आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक विश्वांभर गोल्डे यांनी भेट दिली. सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असून, सर्वत्र दिवाळीचा उत्साह आणि आनंद साजरा केला जात आहे. या आनंदाच्या क्षणाला बीडमध्ये खूनाचा घटनेने गालबोट लागले आहे. चंद्रकांत आश्रुबा जाधव ( वय 55 वर्ष ) रा.पेठ बीड असे मयताचे नाव आहे. रात्री 12:45 वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीने डोक्यात चिरा घालून खून केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार सकाळी उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली आहे.