बीड पोलीस दलातील सायबर पथकाची कामगिरी
बीड : शहरातील सेवानिवृत्ती मेडिकल ऑफिसर शरद गंगाधर फटाले यांना फिशींग लिंकव्दारे सुमारे ५० हजार रुपयांची फसवून गंडा घातला होता. याप्रकरणी सायबर पथकात नोंद करण्यात आली होती. यानंतर सायबर पथकाने चक्रे फिरवून सन २०२४ मध्ये सायबर पोलीस ठाणे बीड यांनी ऑनलाईन फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकरणात तांत्रिक तपास करुन एकुण १०९१३६२२ रुपये परत मिळवुन दिले आहेत.
शरद फटाले (रा.मसरतनगर बीड) यांना दि.३/१/२०२४ रोजी त्यांचे घरी बीड येथे असताना सकाळी ११ वा. त्यांचे मो.क्र वरती एस.बी.आय. योनो नावाने एक मॅसेज आला व सदर लिंकवर फिर्यादी यांनी क्लिक केले असता ते एका बँकेचे साइडवर गेल्याचे त्यांना दिसले व त्यावर त्यांनी लॉगिन केले असता त्यांच्या बँक खात्यातून एकुण ५० हजार रुपये वजा झाले असल्याचे लक्षात आले. त्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाणे बीड येथे येऊन तक्रारी अर्ज दिला त्यांचे तक्रारीवरुन सायबर पोलीस ठाणे बीड यांनी तक्रार नोंदवुन त्यात तक्रारदार यांच फसवणूक झालेल्या ५० हजार रक्कमेचा शोध घेवून सदरील खात फ्रिज केले आहे. पोलीस ठाणे बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक देविदास गात हे करत असून त्यांना गुन्हयाचे तपास कामी मदतनीस म्हणून पांह पंचम बडमारे यांनी काम पाहिले.
सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाणे यांनी तांत्रीक पध्दतीने सखोल तपास करुन फसवणुकीची रक्कम जमा झालेले संशयीत आरोपी लाभार्थी बँक खाते याची माहिती हस्तगत करुन त्या खात्यावर रक्कम ५० हजार रुपये शिल्लक असल्याने ते खाते गोठविण्यात आले. संबंधित बँकेशी व न्यायालय बीड यांचेशी तत्काळ पत्रव्यवहार करून तक्रारदाराची फसवणुक करुन गेलेल्या रक्कमेपैकी ५० हजार रुपये एवढी रक्कम तक्रारदार शरद फटाले यांना तत्काळ परत मिळवून दिले आहे. सन २०२४ मध्ये सायबर पोलीस ठाणे बीड यांनी ऑनलाईन फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकरणात तांत्रीक तपास करुन एकुण १०९१३६२२ रुपये परत मिळवून दिले आहेत.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास गात, पोलीस निरीक्षक संतोष घोडके, पोलीस उपनिरीक्षक आर.जो. कासले, पो.ह. पंचम बडमारे, अनिल डोगरे, अजय जाधव, महिला पोलीस अंमलदार सुमिता शिंदे, शुभांगी खरात यांनी केली आहे.