बीड : शहरातील पांगरी रोडवरील काशिनाथ नगर परिसरात राहणार्या भूते नामक व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि.२२ रोजी घडली असून घरगुती कारणावरून आत्महत्या केली असल्याचे समोर येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त
बीड शहरातील शिवछत्र कॉलनी गिराम नगर पांगरी रोड येथील रहिवासी श्रीरंग भुते यांचा एकुलता एक मुलगा महेश (बबलू) भुते वय 35 वर्षे यांचा मंगळवार दि. 22/10/2024 रोजी दुपारी 12:00 वाजता राहत्या गळफास घेतला. महेश (बबलू) भुते यास तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल बीड येथे हलवण्यात आले. तेथील डॉक्टरानी त्यास योग्य ते उपचार केले परंतु त्याचे उपचारा दरम्यान निधन झाले.
महेश (बबलू) भुते याचे वडील श्रीरंग भुते हे सुंदरआई आय डोनेशन ट्रस्ट, बीड. चे अध्यक्ष नवनाथ नाईकवाडे यांचे मित्र असल्याने त्यांना ही बातमी समजताच ते तत्काळ ट्रस्टचे सदस्य शुभम रांजणकर यांच्या सोबत सिव्हिल हॉस्पिटल बीड येथे दाखल झाले. अश्या दुखत सामयी महेश (बबलू) भुते याचे वडील श्रीरंग भुते, आई लता भुते, पत्नी प्रतिभा भुते यांचे सांत्वन करुन त्यांना नेत्रदानाचे महत्व पटवून दिले. लागलीच त्यानी नेत्रदानास संमती दिली.
सिव्हिल हॉस्पिटल नेत्ररोग विभागातील समुपदेशक सी.एस. गुरव मॅडम, डॉ. समशाद अहमद, डॉ. सी.एस. वाघ, यानी डॉ. आर.आर. जाजु यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदान स्वीकारले, व तत्काळ गणपती नेत्रालय जालना येथे नेत्र रोपण साठी रवाना केले. अंत्यविधि च्या ठिकाणी श्रद्धांजलि वाहताना ट्रस्ट चे अध्यक्ष नवनाथ नाईकवाडे यानी नेत्रदानाचे महत्व सांगितले व महेश (बबलू) भुते याचे आई, वडील, पत्नी, यांचे आभार मानले. सर्वाना अवाहन करण्यात येते की नेत्रदान करन्यासाठी सुंदरआई आय डोनेशन ट्रस्ट, बीड. चे अध्यक्ष नवनाथ नाईकवाडे मो. 9423470050 , समुपदेशक सौ. सी.एस. गुरव मॅडम मो. 7387029914 यांच्याशी 24/7 संपर्क सधवा.