spot_img
3.3 C
New York
Wednesday, January 7, 2026

Buy now

spot_img

बीड एमआयडीसीमध्ये खून

बीड : शहरातील एमआयडीसी भागातील म्हाडा कॉलनीत दोघा परप्रांतीय इलमामध्ये वाद झाला. यातून एकाने चाकू भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री समोर आली आहे. ग्रामीण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बटेवाड यांनी माहिती दिल्याचे वृत्त आहे. समीरभाई भास्त (वय 50 वर्ष) रा. गांधीनगर गुजरात असे मयताचे नाव आहे. तर संशयित आरोपीचे नाव चंदनकुमार राऊत (वय-25 वर्ष) रा. बिहार असे असल्याचे समजते. या दोघांमध्ये दारुच्या नशेत वाद झाला. हा वाद वाढत टोकाला जाऊन चंदनकुमार याने रागाच्या भरात चाकूने भोसकून समीरभाई भारूत यांचा खून केला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी बीड ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बटेवाड यांनी कर्मचान्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून संशयित आरोपी चंदनकुमार राऊत यास घटनास्थळावरुन ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, या तपासातून नेमके कारण समोर येईल. परंतु या घटनेने एमआयडीसी भागात खळबळ उडाली आहे. यातील मयत आणि आरोपी दोघेही परप्रांतीय आहेत.

ताज्या बातम्या