spot_img
20 C
New York
Thursday, September 11, 2025

Buy now

spot_img

जेलमधून घरी येताच बायकोवर झाडल्या गोळ्या

उदगीर : पॅरोलवर सुट्टी घेवून आलेल्या आरोपी पतीने स्वतःच्या पत्नीवर बंदुकीच्या दोन गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उदगीर शहरात मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी फरार झाला आहे.
उदगीर शहरातील सोनू उर्फ अमित नाटकरे हा मागील दोन खूनांच्या प्रकरणात जेलमध्ये होता. यातील एका खून प्रकरणात आरोपी सोनू नाटकरे याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पॅरोलवर सुट्टी घेवून तो उदगीरला आला होता. मागील या दोन केसमध्ये कोर्टात अपील करण्यासाठी पैसे नसल्यामुळे पत्नी भाग्यश्री हिला माहेरहून पैसे घेवून ये म्हणून तिचा सतत छळ करून तिला मारहाण करीत होता. पत्नी समतानगर येथील भीमराव बिरादार यांच्या घरी किरायाने राहत होती.
मंगळवारी रात्री आरोपी सोनू नाटकरे याचा आपल्या पत्नीसोबत माहेरहून पैसे आणण्यासाठी वाद झाला. या वादातून त्याने बंदुकीतील गोळ्या पत्नी भाग्यश्रीवर झाडल्या. त्यात भाग्यश्री यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आर.एम. तारू व सपोनि केंद्रे यांनी भेट देवून पंचनामा केला. घटनेनंतर आरोपी सोनू नाटकरे हा फरार झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे करीत आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

ताज्या बातम्या