अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत सयाची शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. सयाजी शिंदे यांचं सामाजिक क्षेत्रात चांगल काम आहे. त्यामुळे आम्ही आज आमच्या सोबत त्यांना घेत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रवेशावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवार म्हणाले, मी तेच म्हणतोय उभं नका करू उभं नका करू तरीदेखील मला उभं करतात. सयाजी शिंदे यांना झाडांची आवड आहे. सह्याद्री देवराई साठी चांगल काम करत आहेत. सिद्धिविनायक आणि दगडूशेठला सर्वजण जात असतात. साईबाबाला जातात. तिथं प्रसाद म्हणून रोपट दिलं तर देवाचा प्रसाद म्हणून ते चांगल वाढवल जाईल. सयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. मंत्री छगन भुजबळ म्हणाले, आज दसरा उत्सव साजरा करण्याच भाग्य आम्हाला लाभलं आहे. कारण बॉलिवूड पासून टॉलिवूड पर्यंत सयाजी शिंदे यांचं मोठं नाव आहे. मराठी माणूस असून देखील दाक्षिणात्य सिनेमात त्यांचं मोठं नाव आहे. त्यांना तिकडची भाष कशी काय समजते माहिती नाही.परंतु तरीदेखील त्याच मोठ तिकडं नाव आहे. सयाजी शिंदे यांचा प्रवेश म्हणजे आमच्या पक्षाला मिळालेली आपण काम करत असल्याची पोच पावती आहे. कारण त्यांना वाटल की आपण चांगलं काम करत आहोत.