बीड : बीड शहरातील जालना रोड परिसरात एक व्यक्ती कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व मुद्देमाल जप्त केला.
सध्या जिल्ह्यामध्ये नवरात्र महोत्सव चालू होत असून त्या अनुषंगाने पोलिस प्रशासन सतर्क असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पायबंद घालणे सुरू केले असून दि . 1 ऑक्टोबर 2024 रोजी स्थागुशा येथील पोह/अशोक दुबाले, यांना गुप्त बातमीदारा मार्फत इसम नामे शिव सुनिल खोसे रा. माळीवेस याचेकडे गावठी कट्टा असल्याची खबर मिळाली, सदर खबर पो.नि. श्री.उस्मान शेख, स्थागुशा बीड यांना कळवुन त्यांनी पोउपनि मुरकुटे यांचे पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोउपनि मुरकुटे यांनी पथकासह सदर इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली , जालना रोडवरील मिलन बिअरबार समोर असल्याची माहिती मिळाली तेव्हा सापळा लावुन इसम नामे शिव सुनिल खोसे रा. मलिवेस बीड यास शिताफीते पकडुन त्याचेजवळ अवैधरित्या एक गावठी बनावटीची पिस्टल व एक जिवंत राऊंडसह मिळुन आला आहे. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द सरकार तर्फे पोह/मनोज वाघ यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पो.स्टे.बीड ग्रामीण येथे कलम 3,25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. आरोपीचे ताब्यातुन एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकुण किंमती 41,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.