spot_img
19.9 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये लाखोची रक्कम जप्त

बीड : शहरात सुरु असलेल्या हवाला रॅकेटला बुधवारी पोलीस अधीक्षकांनी मोठा दणका दिला.बीड ग्रामीण आणि बीड शहरच्या पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत बीड शहरात तीन ठिकाणी छापे मारले असून हवालाची लाखो रुपयांची रोकड जप्त केली आहे.त्यासोबतच हवाला रॅकेटसाठी वापरले जाणारे यंत्रे, मोबाईल देखील जप्त करण्यात आली आहेत.
बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना सध्या पोलिसांनी लक्ष केले आहे. बीड शहरात हवाला रॅकेट कार्यरत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून बीड ग्रामीण आणि बीड शहर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी संयुक्त कारवाई केली. बीड शहराच्या कबाडगल्ली,डीपी रोडवरील धूत हॉस्पिटलजवळ आणि आणखी एकाठिकाणी पोलिसांनी कारवाई केली.यात तिन्ही ठिकाणाहून लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे बाळराजे दराडे, बीड शहरचे एपीआय राठोड,सिरसाट,मनोज परजणे,अश्फाक सय्यद यांनी ही कारवाई केली आहे.आणखी देखील पोलिसांची कारवाई सुरूच असून निश्चित रक्कमेची मोजदाद सुरु आहे.नूतन पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

ताज्या बातम्या