spot_img
16.6 C
New York
Sunday, October 12, 2025

Buy now

spot_img

अखेर बबन शिंदेला अटक

बीड : जिजाऊ मॉं साहेब मल्टीस्टेटच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेला बबन शिंदे याला अखेर बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावन परिसरातून बबन शिंदेला अटक करण्यात आली आहे. जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून बबन शिंदे फरार होता.
बीडमधील जिजाऊ मॉं साहेब मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात बीड जिल्ह्यात ३ तर धाराशिव जिल्ह्यात २ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला बबन शिंदे मागील वर्षीच्या जुलै महिन्यापासून फरार होता. त्याच्या शोधात ठिकठिकाणी पोलिस पथके कार्यरत होती मात्र सातत्याने आपली ठिकाणे बदलत. सीमकार्ड बदलत तो राहत होता. अखेर त्याच्या संदर्भाने गुप्त माहिती मिळाल्याने वृंदावन मथुरा परिसरात तो वेश बदलून राहत असल्याचे समोर आल्यानंतर आर्थीक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा रचला. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनात आर्थीक गुन्हा शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफिने साधुच्या वेशात राहत असलेल्या बबन शिंदेला बेड्या ठोकल्या आहेत

ताज्या बातम्या