spot_img
10.7 C
New York
Tuesday, May 20, 2025

Buy now

spot_img

महावितरणच्या अधिकारी सोळा हजाराची लाच घेताना पकडला

बीड | प्रतिनिधी
लाचखोरांचे वाढते प्रमाण जिल्ह्यात चर्चेत असून शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महावितरणच्या महिला अधिकार्‍यासह अन्य एकाला रंगेहात पैसे घेताना पकडले आहे. एसीबीने दिलेला शॉक महावितरणसाठी जोरदार ठरला असून या प्रकरणाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे.
पूनम लहू आमटे (विद्युत सहाय्यक) या धानोरा रोडच्या उपकेंद्रात नौकरीला आहेत. एका ग्राहकांच्या घरात महावितरणने वीज चोरी समोर आणल्यानंतर त्या ग्राहकाला वीज चोरीचे प्रकरण समोर न आणण्यासाठी २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यात तडजोडीअंती १६ हजार रुपये घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा रचून लाच घेताना खाजगी इसम मानेला रंगेहाल पकडले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पूनम आमटे व खाजगी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरत गारदे, अमोल खरसाडे, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, संतोष राठोड, अविनाश गवळी, स्नेहलकुमार कोरडे, अंबादास पुरी, गणेश मेहेत्रे यांच्यावतीने करण्यात आली.

ताज्या बातम्या