spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

गोंदे येथे बिबट्याने मुलाला उचलले;मुलगा ठार

ज्ञानेेश्‍वर काकड | नाशिक
शुक्रवारी संध्याकाळी ९ वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी वडीलासह बाहेर आलेल्या मुलाला बिबट्याने वडीलांसमोर उचलून नेल्याची घटना गोंदे येथे घडली. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला असून पुन्हा बिबट्याचा वावर वाढला असल्याचे यावरून लक्षात येते. या प्रकरणी वन विभागाला माहिती देण्यात आली असून बिबट्याचा शोध घेण्याचे काम चालू असल्याचे समजते.
प्रफुल्ल रवींद्र तांबे हा मुलगा वडिलांसोबत घराबाहेर आला होता. लघुशंका करुन तो घरात जात असताना पाठीमागून बिबट्याने हल्ला करुन त्याची मान पकडली व क्षणात जवळच्या मक्याच्या शेतात उचलून नेले. त्याचे वडील रवींद्र तांबे यांनी आरडाओरड केली. यावेळी घरातील लोक बाहेर आले. आरडा ओरड करुन वस्तीवरील नागरिक जागे केले. हातात लाठ्या काठ्या घेवून त्याचा शोध घेतला. मक्याच्या शेतात एका ठिकाणी त्याची पँट पडलेली दिसली. त्या दिशेने सर्वांनी शोध घेतला असता तो जखमी अवस्थेत मिळून आला. उपचारासाठी सिन्नरला आणले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. बिबट्याने मान, छातीवर जखमा केल्या होत्या. अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुजीत बोकडे, किरण गोर्डे, रुपवते, पंढरी तांबे आदींनी रात्रभर बिबट्याचा शोध घेतला.

ताज्या बातम्या