केज : तालुक्यातील कानडी, कासारी, धर्माळा, साबला परिसरात चोरट्यांना रात्री ग्रामस्थांनी बेदम मारहाण करत रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पकडले.
केज तालुक्यातील कानडी परिसरात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ड्रोनच्या सहायाने चोरी करण्याच्या उद्देशाने एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी फेर्या मारत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी त्यांना हटकले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. यावेळी ग्रामस्थांना त्यांना पकडले.त्यानंतर ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिल्यानंतर हात पाय बांधून रात्र जागून काढली त्यानंतर सकाळी पोलिसांना फोन करून त्या चोरट्यांना पोलिसांच्या हवाली करण्यत आले असून पुढील तपास केज पोलिस करत आहेत.