spot_img
24.3 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img

सावधान! विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार

पुणे : राज्याच्या काही भागात पावसानं धुमाकूळ घातचला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आले आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या माहिततीनुसार, आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातच आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात आणि झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल तेवढी द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच शेतकर्‍यांनी देखील सरकारनं आम्हाला मदत करावी अशी मागणी केली आहे.
राज्यात सध्या बेफाम पाऊस झाल्याने नागरिकांची दाणादाण उडाली आहे. विदर्भासह मराठवाड्यात पावसानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळं अनेक शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२४-२५ मधील विमाधारक शेतकर्‍यांचं सततच्या पावसामुळे शेतात पाणी शिरल्यानं नुकसान झालं असेल तर ७२ तासांच्या आत कळवणं बंधनकारक आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्हाला पिकाच्या नुकसानाची तक्रार करावी लागेल. त्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या संकेतस्थळावर जा.  https://pmfby.gov.in/ यानंतर त्यावर रिपोर्ट क्रॉप लॉसवर क्लिककरून कोणत्या इंन्शूरंस कंपनीमध्ये तुमच्या पिकाचा विमा काढला आहे ती कंपनी निवडून त्यात आपले सर्व तपशील भरा. त्यानंतर नुकसानीची तक्रार दाखल केल्यानंतर मिळणारा नं सेव्ह करा.

ताज्या बातम्या