spot_img
20.1 C
New York
Saturday, July 5, 2025

Buy now

spot_img

बिंदुसरा धरण भरले, पूराची शक्यता

सतर्क राहण्याच्या न.प.मुख्याधिकार्‍यांच्या सूचना
बीड : शहरालगत असलेल्या बिंदुसरा धरण गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे बिंदुसरा नदीला कधीही पुर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. आणि अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जोरदार पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी,ओढे,नाले वाहू लागले आहेत. बीड शहरापासून जवळ असलेल्या बिंदुसरा प्रकल्प जवळील,वरील छोटे तलाव,नद्या संततधार पाऊस झाल्याने ओसंडून वाहत आहेत.त्यामुळे बिंदुसरा प्रकल्प भरला आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२४ पर्यंत ५६३.६ मी.मी.पावसाची नोंद आहे. पाऊसाचा असाच जोर कायम राहिला तर बिंदुसरा धरण बिंदुसार धरणाला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिंदुसार नदीकाठी रहणार्‍या नागरिकांना नगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर नियंत्रण रेषेत राहणार्‍या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, कुठल्याही परिस्थितीमध्ये जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी असे आवाहन बीड नगरपालिका मुख्याधिकारी नीता अंधारे व बीड तहसीलदार याने केले आहे.

ताज्या बातम्या